१) शैलपुत्री :
दुर्गा देवीचे प्रथम स्वरुप शैलपुत्री आहे. दुर्गा मातेच्या नऊ रुपांपैकी हे पहिले रुप मानले जाते. शैलपुत्री पर्वतराज हिमालय कन्या आहे.
आजचा रंग - पिवळा (Yellow)
२) ब्रह्मचारिणी :
दुर्गा देवीचे द्वितीय स्वरुप ब्रह्मचारिणी आहे. या रुपाच्या एका हातात अष्टदलाची माळ आणि दुसऱ्या हातात कमंडलू आहे. ब्रम्हचरणीचा अर्थ होतो तपाचे आचरण करणारी.
आजचा रंग - हिरवा (Green)
३) चंद्रघंटा :
दुर्गा देवीचे तिसरे स्वरुप चंद्रघंटा आहे. चंद्रघंटा देवीने ललाटावर चंद्र धारण केला आहे. नवरात्रात तिसऱ्या दिवशी देवीच्या या रुपाचे पूजन केले जाते.
आजचा रंग - राखाडी (Grey)
४) कुष्मांडा :
दुर्गा देवीचे चौथे स्वरुप कुष्मांडा आहे. ब्रह्मांडाची निर्मिती केल्यामुळे या रुपाला कुष्मांडा असे संबोधले जाते. कुष्मांडा आपल्या भक्तांची सर्व संकटे, रोग, शोक दूर करून यश, बुद्धी आणि दीर्घायुष्य प्रदान करते.
आजचा रंग - केशरी (Orange)
५) स्कंदमाता :
दुर्गा देवीचे पाचवे स्वरुप स्कंदमाता आहे. कार्तिकेय (स्कंद) माता असल्याने हे रुप स्कंदमाता म्हणून ओळखले जाते. दुर्गा मातेचे पाचवे रुप मोक्ष आणि प्रत्येक सुख प्रदान करते.
आजचा रंग - पांढरा (White)
६) कात्यायणी :
दुर्गा देवीचे सहावे स्वरुप कात्यायणी आहे. महर्षी कात्यायण यांच्या घरी अवतार घेतल्यामुळे या रुपाला कात्यायणी म्हटले जाते. कात्यायणी पूजनाने धर्म, अर्थ, काम आणि मोक्षाची प्राप्ती होते.
आजचा रंग - लाल (Red)
७) कालरात्रि :
दुर्गा देवीचे सातवे स्वरुप कालरात्रि आहे. कालरात्रिचे रुप भयंकर आहे. कालरात्रि देवी सदैव शुभ फलाची प्राप्ती करून देत असल्यामुळे तिला शुभंकरी असेही म्हटले जाते. हे रुप खूपच शक्तीशाली मानले जाते.
आजचा रंग - निळा (Blue)
८) महागौरी :
दुर्गा देवीचे आठवे स्वरुप महागौरी आहे. महागौरीने कठोर तपस्या करून पार्वतीच्या रुपात महादेव शंकराला प्रसन्न करून घेतले होते.
आजचा रंग - गुलाबी (Pink)
९) सिद्धिदात्री :
दुर्गा देवीचे नववे स्वरुप सिद्धिदात्री आहे. सर्व प्रकारच्या सिद्धी प्रदान करणारी देवी म्हणून या रुपाला सिद्धिदात्री म्हणून संबोधले जाते. यादिवशी कन्या पूजन देखील केले जाते.
आजचा रंग - जांभळा (Purple)