पायवाट, हा शब्द कानावर पडला कि आपण आपसूक बालपणीच्या आठवणीत रमतो. मन वाऱ्यावर तरंगत आपल्या गावात जाऊन पोहचते. गरजेचे नाही कि आपल्या सगळ्यांच गाव किंवा राहण्याचे ठिकाण काही प्रसिद्ध असते पण तरीही प्रत्येक जागेचे काही ना काही तरी वैशिष्ट असते. आपल्यासाठी का होईना पण त्या जागेच खुप महत्व असते. आमचा हा उपक्रम अश्याच छोट्या छोट्या ठिकाणांचा मागोवा घेणारा आहे. आणि हो हि पायवाट अमेरीका आणि भारताला जोडणारी आहे. या पायवाटेने आपल्या सगळ्यांना अनोळखी पण नवीन आणि वैशिष्ट्यपूर्ण अशा ठिकाणांची नक्कीच ओळख होईल.

जगप्रसिद्ध ठिकाणांबद्दल आंतरजालावर खूप माहिती आहे पण छोट्या छोट्या ठिकाणांची नाही. चला मग सुरवात करू आणि सगळ्यांना त्याबद्दल माहिती करून देऊ. या पायवाटेवर मला तुम्हा सगळ्यांची गरज लागणार आहे. तुम्ही सुद्धा आपल्या गावाबद्दल, राहत्या ठिकाणाबद्दल किंवा तुम्ही भेट दिलेल्या जागेबद्दल माहिती व फोटो आम्हाला पाठवू शकता. तुमची काही हरकत नसेल तर आम्ही तुमच्या नावासकट ते प्रसिद्ध करू. आमचा ई-मेल लवकरच आपणास इथे मिळेल.